Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 114 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 97 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 97 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 75 हजार 532 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 114 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 71 हजार 001 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Pimpri Corona) देण्यात आला आहे.

 

शहरात 784 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 784 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील याआधी मृत्यू झालेल्या 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4478 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 9647 जणांचे लसीकरण
बुधवारी (दि.20) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 9647 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 21 लाख 94 हजार 137 जणांना लस देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यात 4266 अ‍ॅक्टिव्ह
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 47 हजार 661 रुग्णांपैकी 11 लाख 24 हजार 451 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण 4 हजार 266 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 944 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.98 टक्के आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | Comfortable! Discharge of 114 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rupali Chakankar | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! रूपाली चाकणकर यांची ‘या’ पदावर केली नियुक्ती

EPFO-EDLI Scheme | ईपीएफओ मेंबर्सला ईडीएलआय योजनेची ‘ही’ सर्व वैशिष्ट्य माहिती असणं अत्यंत गरजेचं , जाणून घ्या

Pune Crime | सराईत गुन्हेगार पृथ्वीराज कांबळेवर MPDA अंतर्गत कारवाई, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 44 वी कारवाई

Pune Corona | दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळं एकही मृत्यू नाही; 118 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी