Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 217 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 119 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरामध्ये 8 हजार 898 संशयित रुग्णांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 119 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 72 हजार 450 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 217 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 67 हजार 680 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात 1083 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 1083 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. आज दिवसभरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 01 रुग्ण शहरातील आहेत. तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4418 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 22,267 जणांचे लसीकरण
शनिवारी (दि.18) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 22,267 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 17 लाख 42 हजार 653 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Titel :- Pimpri Corona | Comfortable! Discharge of 217 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BMC | बीएमसीची घोषणा ! गणेश चतुर्थीनंतर मुंबईत परतणार्‍यांना करावी लागेल कोविड-19 चाचणी

Pune Court | डॉक्टर महिलेला मिळणार 75 हजार रुपयांची पोटगी; दरमहा रक्कम देण्याचे कौटुंबिक न्यायालयाचे आदेश

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर