Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 98 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 63 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 63 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 75 हजार 737 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 98 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 71 हजार 281 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून (Pimpri Corona) डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 705 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 705 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4482 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 11,664 जणांचे लसीकरण
शनिवारी (दि.23) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 11,664 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 22 लाख 24 हजार 389 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | Comfortable! Discharge of 98 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | संतोष जगतापची ‘गेम’ करणार्‍या दोघांच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या; इंदापूर परिसरातून अग्नीशस्त्रे अन् वाहनासह अटक

Aurangabad Crime | लग्नानंतर 8 महिन्यातच महिला इलेक्ट्रिक इंजिनिअरची आत्महत्या, औरंगाबादमधील खळबळजनक घटना

RTO Registration Certificate | RTO चा नवा नियम ! वाहन खरेदीनंतर नोंदणीसाठी आरटीओमध्ये जाण्याचे हेलपाटे थांबणार