Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 100 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 100 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 100 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 75 हजार 169 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 87 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 70 हजार 567 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Pimpri Corona) देण्यात आला आहे.

शहरामध्ये सध्या 865 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात शहरातील तीन रुग्णाच्या मृत्यूची तर नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,468 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 21,171 जणांचे लसीकरण

गुरुवारी (दि.14) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 21 हजार 171 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 21 लाख 38 हजार 313 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | Diagnosis of 100 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुण्यातील गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीला अडथळा ठरणारा लकडी पूलावरील मेट्रो पूलाबाबत मध्यम मार्ग काढणारच – आबा बागूल

Kolhapur Crime | दुर्दैवी ! दांडीया पाहून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

Post Office Schemes | दररोज 150 रुपयांच्या सेव्हिंगने बनवू शकता 15 लाखापर्यंतचा फंड; Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक