Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 166 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad Corona) कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनामुक्त (Recover patient) होणाऱ्यांची संख्या घटली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 166 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्यांचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 166 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 70 हजार 469 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 104 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 64 हजार 784 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात 1542 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 1542 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. आज दिवसभरात शहरातील 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4403 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 26,899 जणांचे लसीकरण

रविवारी (दि.5) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 26 हजार 899 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 15 लाख 34 हजार 136 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona | Diagnosis of 166 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chakan Crime | जुगार अड्यावर चाकण पोलिसांचा छापा, जागा मालकासह 10 जणांवर FIR

Rain in Maharashtra | येत्या 5 दिवसांत मुंबईसह पुण्यात ‘धो-धो’ पाऊस, नंदुरबार वगळता पावसाची राज्यात सर्वदूर बरसणार

Dhananjay Munde | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल, प्रचंड खळबळ