Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 37 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाबाधितांच्या (Pimpri Corona) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. शहरात आज 37 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (Pimpri Corona) नोंद झाली आहे. तर 29 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत 2 लाख 73 हजार 548 रुग्णांनी मात (Recover) केली आहे. शहरात रुग्णांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे.

 

पिंपरी चिंचवड शहरात आज एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णांचा (Pimpri Corona) अहवाल आज प्राप्त झाला आहे) झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरात आजपर्यंत 4 हजार 512 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे. सध्या शहरात 337 रुग्ण सक्रिय आहेत. यामध्ये 124 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर 213 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 22 लाख 24 हजार 203 प्रयोगशाळा तपासण्यांमध्ये 2 लाख 77 हजार 666 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

 

दिवसभरात 17,989 जणांचे लसीकरण

पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या वतीने आणि खासगी कोविड लसीकरण (Covid vaccination) केंद्रातून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीचे डोस दिले जात आहेत. आज (शनिवार) दिवसभरात 19 हजार 989 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहरात 26 लाख 47 हजार 227 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | Diagnosis of 37 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Covid Variant | कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले संकेत, म्हणाले…

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 90 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Maharashtra Rains | बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ ! किनारपट्टी भागात रेड अलर्ट; पुढील 2 ते 3 तासात पुण्यासह 16 जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी

Ramnath Kovind | रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास शिवप्रेमींचा विरोध ! राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतला मोठा निर्णय

How To Become Crorepati | फक्त 15,000 रुपये महिना गुंतवणुकीतून बनू शकता करोडपती, जाणून घ्या काय आहे फार्म्युला

PM Kisan | खुशखबर ! 1 आठवड्यानंतर शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 4000 रुपये, राज्य सरकारांनी केली आहे तयारी, चेक करा स्टेटस

खुलेआम सुरू आहे बनावट Aadhaar Card बनवण्याच धंदा, 10 मिनिटात तयार करतात कॉपी; असे ओळखा बनावट आणि खरे