Homeताज्या बातम्याPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 'कोरोना'च्या 42 रुग्णांचे निदान,...

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 42 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना नव्या व्हेरिएंटने आरोग्य विभागाची झोप उडवली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात रुग्णांच्या (Pimpri Corona) संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 42 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे) झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PCMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona)
गेल्या 24 तासात 3192 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात (Pimpri Corona) आली आहे. त्यापैकी 42 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आजपर्यंत शहरात 22 लाख 01 हजार 565 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 2 लाख 77 हजार 504 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
गेल्या 24 तासात शहरात 49 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आतापर्यंत 2 लाख 73 हजार 384 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

सध्या शहरामध्ये 342 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मनपा हद्दीबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत शहरात 4509 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या वतीने आणि खासगी कोविड लसीकरण (vaccination) केंद्रातून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे.
महापालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीचे डोस दिले जात आहेत.
आज (मंगळवार) दिवसभरात 19 हजार 343 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहरात 25 लाख 82 हजार 339 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | Diagnosis of 42 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Erica Fernandes | TV अभिनेत्री एरिका फर्नांडिसचा ब्लू बिकनी जलवा, चाहते झाले घायळ

Debashish Chakraborty | राज्याला मिळाले नवे नवीन मुख्य सचिव, सिताराम कुंटेंनी सोपवला देबाशीष चक्रवर्तींकडे पदभार

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 78 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News