Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 49 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 49 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 47 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC Medical department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 375 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 49 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना (Pimpri Corona) बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 77 हजार 771 इतकी झाली आहे. त्यापैकी 2 लाख 73 हजार 650 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरामध्ये सध्या 339 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून यामध्ये 206 संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये (institutional quarantine) आहेत. तर 133 जणांवर होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात हद्दीबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची तर नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,513 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 20,663 जणांचे लसीकरण
मंगळवारी (दि.7) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 20 हजार 663 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 27 लाख 07 हजार 515 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | Diagnosis of 49 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shani Sadesati 2022 | लवकरच कुंभ राशीत प्रवेश करणार ‘शनि’; ‘या’ राशीच्या लोकांना घ्यावी लागणार काळजी, जाणून घ्या

Satara District Bank Election | ‘माझी शिफारस नसल्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत’ – शशिकांत शिंदे

तुमचे Corona Vaccine Certificate बनावट तर नाही ना? अशाप्रकारे CoWIN पोर्टलवर करू शकता चेक

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दररोज 334 रुपयांची गुंतवणूक ! काही वर्षात मिळू शकते 15 लाखापेक्षा जास्त रक्कम, समजून घ्या – गणित