Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 58 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona) प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान ओमायक्रॉनचे (Omycron variant) चार रुग्ण बरे झाले असतानाच नव्या 4 रुग्णांचा ओमायक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत भर पडली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 58 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) गेल्या 24 तासात 4513 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 58 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 27 लाख 07 हजार 937 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 2 लाख 77 हजार 937 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या 24 तासात शहरात 66 रुग्णांनी कोरोनावर मात (Recover) केली असून त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आतापर्यंत 2 लाख 73 हजार 837 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

सध्या शहरामध्ये 318 सक्रिय रुग्ण (active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यामध्ये 191 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 127 लोक होम क्वारंटाईनमध्ये (Home Isolation) आहेत.
दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरात 4513 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | Diagnosis of 58 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

SBI Customers Alert | ‘एसबीआय’च्या ग्राहकांनी लक्ष द्यावे ! ATM मधून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ गाईडलाईन

Hemant Rasne | पुण्यातील मध्यवर्ती पेठांतील रस्ते 20 जानेवारीपर्यंत पूर्ववत होणार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती

Omicron Covid Variant in Pune | नायजेरियातून पिंपरीत आलेल्या आणखी 4 जणांना ‘ओमायक्रॉन’ची बाधा