Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 64 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 64 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 64 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना (Pimpri Corona) बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 77 हजार 237 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 67 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 73 हजार 083 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरामध्ये सध्या 379 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील (Pimpri Corona) एका रुग्णाच्या मृत्यूची तर नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,506 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 9,356 जणांचे लसीकरण
बुधवारी (दि.24) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 9 हजार 356 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 25 लाख 06 हजार 641 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | Diagnosis of 64 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sulakshana Shilwant | शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश ! राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांचे नगरसेवक पद रद्द; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

Monalisa Viral Video | मोनालिसाच्या स्विमिंगपूलमधील ‘या’ हॉट व्हिडिओनं नेटकऱ्यांचा वाढवला ‘पारा’ (Video)

Pune Crime | जुन्नर तालुक्यात भरदिवसा पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा ! गोळीबारात व्यवस्थापकाचा मृत्यू; परिसरात प्रचंड खळबळ (व्हिडिओ)

Post Office Monthly Income Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम तुम्हाला देईल दरमहा पैसे, इतक्या वर्षात होईल 1.50 लाखाचा फायदा

Multibagger Penny Stock | 6 रुपयांचा शेअर पोहोचला 188 रुपयांवर, 1 वर्षात 3 हजार टक्के रिटर्न; गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 31 लाख, जाणून घ्या