Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 65 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना (Pimpri Corona) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असताना ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omycron Variant) चिंता वाढवली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 65 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 65 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 78 हजार 588 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 54 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 74 हजार 422 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरामध्ये सध्या 377 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,520 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण
(Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर
लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 13 हजार 961 जणांना लस
देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारामध्ये 29 लाख 06 हजार 093 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title :- Pimpri Corona | Diagnosis of 65 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | 12 लाख पेन्शनधारकांसाठी ‘इथं’ वाढला DR, परंतु यांना होणार नाही लागू

Crime News | मुलीला पळवून केलं ‘शुभमंगल’, तरूणीच्या नातेवाईकांनी तरूणाचा चक्क प्रायव्हेट पार्टचं कापून केलं ‘अमंगळ’

Omicron Restrictions Maharashtra | राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू ! रात्री ‘या’ वेळेत जमावबंदी; सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध, जाणून घ्या नवीन नियमावली

Pune Crime | तुझ्या वडीलांनी उमेदवारी अर्ज माघारी का घेतला नाही म्हणत एकास मारहाण

Bank Holidays List | जानेवारी 2022 मध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी पाहून घ्या सर्व सुट्ट्यांची यादी