Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 121 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 108 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 108 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 75 हजार 069 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 121 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 70 हजार 480 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना (Pimpri Corona) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 854 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 854 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4466 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 9,195 जणांचे लसीकरण

बुधवारी (दि.13) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 9,195 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 21 लाख 17 हजार 142 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | Discharge of 121 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

RIL | रिलायन्सची जर्मनीच्या नेक्सवेफमध्ये (NexWafe) गुंतवणूक, डेन्मार्कच्या स्टीसडलसह (STIESDEL) सामरिक भागीदारी

Pune-Mumbai Sinhagad Express | सिंहगड एक्सप्रेस सोमवार पासून धावणार, 19 महिने होती बंद

Gold Price Today | सोन्याच्या दरात 63 रुपयांची वाढ; जाणून घ्या 1 तोळ्याचा नवीन दर