Pimpri Corona | ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 149 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 104 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 6175 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 104 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Pimpri Corona) संख्या 2 लाख 74 हजार 606 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 149 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 69 हजार 984 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 897 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 897 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
यामध्ये 02 रुग्ण शहरातील आहेत. तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. गेल्या 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4456 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 1770 जणांचे लसीकरण

शुक्रवारी (दि.08) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 1770 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 20 लाख 53 हजार 373 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | Discharge of 149 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation Elections | पतित पावन संघटनेचा ‘भाजप’ला धक्का ! पुणे महापालिका निवडणुक लढविण्याची घोषणा; जाणून घ्या भूमिका

IPS Transfer Maharashtra | हरीश बैजल सोलापूरचे नवे पोलिस आयुक्त ! पुण्याच्या गुन्हे शाखेत अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे यांची नियुक्ती

Pune News | ‘जेनेसीस इंडिया’च्या पदाधिकारी प्रोमोही शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा