Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 183 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 164 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत. तर 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 164 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 65 हजार 005 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 183 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 59 हजार 731 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 892 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 02 रुग्ण शहरातील आहेत. तर 02 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (दि.3) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 10,629 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 11 लाख 27 हजार 754 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Tital : Pimpri Corona | Discharge of 183 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

 

Aadhaar चा अड्रेस अपडेट करणे झालं एकदम सोपे, अवलंबा ‘ही’ ऑनलाइन पद्धत; जाणून घ्या

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 237 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Parambir Singh | परमबीर सिंहांच्या अडचणीत आणखी वाढ; वसुली प्रकरणात दाऊदचा निकटवर्तीय छोटा शकीलची एंन्ट्री?

Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावर पोलीस असल्याचे भासवून एसटी प्रवाशांचे सव्वा कोटी लुटले