Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 122 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 122 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 73 हजार 450 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 243 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 69 हजार 903 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून (Pimpri Corona) डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 848 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 848 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 01 रुग्ण शहरातील आहेत. तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4430 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 23,075 जणांचे लसीकरण

रविवारी (दि.26) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 23,075 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 18 लाख 80 हजार 040 जणांना लस देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.75 %
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 35 हजार 634 रुग्णांपैकी 11 लाख 10 हजार 111 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण 6 हजार 741 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 782 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.75 टक्के आहे.

Web Title :- Pimpri Corona | Discharge of 243 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो, पण…’, माजी मंत्री विजय शिवतारेंनी खंत व्यक्त करत दिला ‘हा’ इशारा (Video)

Pune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण

BJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही’, भाजप आमदार सुनिल कांबळे यांचे स्पष्टीकरण