Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 47 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरताना नव्या व्हेरिएंटने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 46 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दुपारी चार वाजेपर्यंत 6 हजार 528 संशयितांची तपासणी करण्यात आली यामध्ये 46 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 77 हजार 590 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 47 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 73 हजार 475 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरामध्ये सध्या 335 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
गेल्या 24 तासात शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

गुरुवारी (दि.02) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 1 हजार 966 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 26 लाख 05 हजार 527 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | Discharge of 47 corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bigg Boss 15 | राखीचा पती रितेशने केलं तेजस्वी प्रकाश सोबत ‘असं’ काही की तेजस्वी म्हणाली, ‘तरी सुद्धा हे लोक संस्कारांबद्दल बोलतात..’

CBDT ने दिड कोटीपेक्षा जास्त करदात्यांना दिला 1,29,210 कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा, जाणून घ्या टॅक्स रिफंड स्टेटस तपासण्याची प्रक्रिया

Anti Corruption Bureau Pune | बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 1 लाखाच्या लाचेची मागणी ! महिला पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अँटी करप्शनच्या जाळ्यात

PMC Property Tax | 50 लाख रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या मिळकतधारकांसाठी ‘अभय योजना’ ! 730 मिळकतधारकांकडे 1100 कोटी रुपयांची थकबाकी