Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 84 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 33 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार,
आज दिवसभरात शहरात 4493 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 33 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 75 हजार 367 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 84 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 70 हजार 794 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Pimpri Corona) देण्यात आला आहे.

शहरात 830 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 830 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
यामध्ये 01 रुग्ण शहरातील आहेत. तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. गेल्या 24 तासात एकाही रुग्णांचा मृत्यू झालेल नाही.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 9807 जणांचे लसीकरण

सोमवार (दि.08) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 9807 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 21 लाख 72 हजार 853 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | Discharge of 84 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Shivaji University Recruitment 2021 | कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात लवकरच ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या

Maharashtra Unlock | राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना, मुख्यमंत्र्यांकडून निर्बंध शिथील

Parambir Singh | परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ ! …तर अटक वॉरंट निघणार?