Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 34 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात (Pune district) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना पिंपरी चिंचवड शहरात देखील कोरोना (Pimpri Corona) बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. शहरात गेल्या 24 तासात 45 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 34 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात (Recover) केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

 

शहरामध्ये गेल्या 24 तासात 7 हजार 096 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 45 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज पर्यंत शहरात 23 लाख 10 हजार 818 चाचण्यांपैकी 2 लाख 78 हजार 268 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 2 लाख 74 हजार 124 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या शहरात 356 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (active patient) आहेत यामध्ये 207 जणांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर 149 जणांवर घरी उपचार सुरु आहेत. (Pimpri Corona)

शहरात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मात्र यापूर्वी मृत्यू झालेल्या एका रुग्णाचा मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. हा रुग्ण शहराबाहेरील आहे. शहरात आजपर्यंत 4 हजार 519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात शहातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 69 आणि 132 खासगी कोविड-19 लसीकरण (Vaccination) केंद्रावर 10 हजार 961 जणांना लस देण्यात आली. आजपर्यंत शहरात 28 लाख 51 हजार 187 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

 

 

Web Title :- Pimpri Corona | In the last 24 hours, 34 patients of ‘Corona’ were discharged in Pimpri Chinchwad. Find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Modi Government | मोदी सरकारने 23 कोटी लोकांच्या खात्यात पाठवले पैसे, तुमच्या खात्यात आले नाहीत का? तात्काळ ‘इथं’ करा तक्रार

Hruta Durgule | ‘फक्त 8 दिवस बाकी’ असं म्हणत ऋता दुर्गुळेनं शेअर केला प्रियकरासोबत फोटो, चाहत्यांमध्ये रंगल्या तुफान चर्चा

Clapping Benefits | बोलताना टाळी वाजवत असाल तर होतील ‘हे’ फायदे, जाणून तुम्हाला वाटेल आश्चर्य

‘या’ Multibagger Penny Stock मध्ये 3 वर्षात 1 लाख रुपयांच्या बदल्यात मिळाले 91 लाख रुपये, 2 रुपयांच्या शेयरचा भाव झाला 196 रुपये

Modi Government | गावात राहणार्‍या महिलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा ! मोफत देणार 5000 रुपयांची ‘ओव्हरड्राफ्ट’ सुविधा, जाणून घ्या कुणाला आणि कधी

Pune Crime | खळबळजनक ! नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी ! पुण्यात 19 वर्षीय तरुणीवर मित्रांकडून सामूहिक बलात्कार