YCMH रुग्णालयात होणार ‘कोरोना’ टेस्ट, दिवसाला 376 नमुने तपासण्याची क्षमता

पिंपरी/पुणे : पोलीसामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच रुग्णालयात शुक्रवार (दि.3) पासून कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. आयससीएमआरच्या मान्यतेने पिंपरी चिंवडमधील वायसीएमएच रुग्णालयात स्वॅब तपासणी करण्यासाठी स्वतंत्र कोविड लॅब सरु करण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेला लॅब सुरु करण्याचा बहुमान मिळाला असून राज्यातील ही तिसरी महापालीका ठरली आहे.

या संदर्भात महापालीका आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी सांगितले की, पिंपरी चिचंवड महापालिकेच्या वायसीएमएच रुग्णालयामध्ये कोविड लॅब सुरु करण्यात आली आहे. या लॅबमध्ये दिवसाला 376 स्वॅब तपासण्याची क्षमता असून सुरुवातीला 20 ते 40 स्वॅब तपसले जाणार आहेत. यानंतर याची क्षमता वाढवण्यात येणार आहे. या लॅबमध्ये प्रत्येक दोन तासाला 96 स्वॅब तपसले जाणार असल्याने रिपोर्ट मिळण्यास वेळ लागणार नाही.

पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील कोरोना संशयितांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्था, भोसरीतील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (नारी), आयसर, हायरोकेअर, कृष्णा, आयसीएमआर, मेट्रो पोलीस, आदित्य बिर्ला याठिकाणी पाठवण्यात येत होते. आता वायसीएमएच रुग्णालयात कोविड लॅब सुरु झाल्याने रिपोर्ट लवकरात लवकर मिळण्यास मदत होणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like