Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या पाचशेच्या आत, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 45 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. शहरातील नवीन रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. तसेच बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही शहरासाठी दिलासादायक बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 45 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 45 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 995 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 35 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 72 हजार 800 रुग्णांनी कोरोनावर (Pimpri Corona) मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरामध्ये सध्या 422 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड हद्दीमधील एका रुग्णाच्या मृत्यूची तर नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा (Pimpri Corona) अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,504 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 14,317 जणांचे लसीकरण

शुक्रवारी (दि.19) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 14 हजार 317 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 24 लाख 53 हजार 326 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | The number of active patients in Pimpri Chinchwad is within 500, with 45 patients diagnosed with Corona in the last 24 hours; Learn other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sharad Pawar | ‘या’ कारणामुळं मोदी सरकारनं कृषी कायदे मागे घेतले – शरद पवार

Legislative Council Election | शिवसेनेचा एकाच दगडात निशाणा? एकनिष्ठ राहणाऱ्यांना आमदारकी तर रामदास कदमांना बाहेरचा रस्ता

PF Nominee | ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या करू शकता आपल्या PF नॉमिनीमध्ये बदल; EPFO सांगत आहे ‘स्टेप बाय स्टेप’ प्रोसेस