Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1084 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांच्या संख्येत घट होत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने दिलासा मिळाला आहे. आज शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 1084 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 2383 रुग्ण बरे झाले आहेत.

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 7 हजार 460 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1084 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 51 हजार 822 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2383 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 36 हजार 067 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

शहरात 11,910 सक्रिय रुग्ण

शहरामध्ये सध्या 11,910 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 306 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 11,604 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आज शहरातील 04 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,576 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title : Pimpri Corona Update | 1084 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’