Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 12 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 12 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 31 रुग्ण बरे झाले आहेत.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 1 हजार 093 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 59 हजार 044 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 55 हजार 034 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 118 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 13 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 105 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आज शहरात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 2976 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहरामध्ये 34 लाख 65 हजार 407 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Update | 12 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा