Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1694 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) लाट ओसरताना पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Update) 455 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 05 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दुपारी चार वाजेपर्यंत 7 हजार 762 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 455 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 55 हजार 974 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1694 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 46 हजार 850 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (Pimpri Corona Update)

 

शहरामध्ये सध्या 5254 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 190 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 5064 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. यामध्ये 4 शहरातील तर हद्दीबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,601 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी (दि.09) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 5 हजार 983 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 33 लाख 32 हजार 892 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Update | 1694 corona patients discharged in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा