Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 335 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना (Pimpri Corona Update) रुग्णांच्या संख्येत चढ उतार पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Update) 335 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 335 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 56 हजार 711 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1177 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 49 हजार 106 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Pimpri Chinchwad Update)

 

शहरामध्ये सध्या 3728 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात शहराबाहेरील 01 आणि शहरातील 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
गेल्या 24 तासात शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,608 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :-  Pimpri Corona Update | 335 corona patients diagnosed in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya in PMC | किरीट सोमय्या यांच्या ‘पायर्‍यांवरील’ सत्कारावेळी महापालिका भवनला पोलिस छावणीचे स्वरुप; सर्वसामान्य नागरिकांना व कर्मचार्‍यांनाही महापालिकेत प्रवेश बंदी केल्याने दिवसभर काम ठप्प (व्हिडीओ)

 

Urfi Javed | अभिनेत्री उर्फी जावेदने ब्लाऊजशिवाय साडी नेसून दाखवल्या बोल्ड अदा; चाहतेही थक्क

 

Coronavirus in Maharashtra | गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5,455 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी