Pimpri Corona Update| पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या नवीन रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शहरातील रुग्णसंख्या कमी होत असल्याने आणि शून्य मृत्यूची नोंद होत असल्याने शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 10 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 22 रुग्ण बरे झाले आहेत.

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 119 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 59 हजार 030 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 22 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 985 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे. शहरामध्ये सध्या 153 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 40 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 113 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आज शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 3270 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 34 लाख 62 हजार 377 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Update | Big drop in new corona patients in Pimpri Chinchwad, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nandurbar Police | मुलाने महिलेला पळवल्याच्या रागातून वडिलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, 5 आरोपींना नंदुरबार पोलिसांनी केली अटक

 

Tandul Mahotsav Pune 2022 | अजित पवार यांच्याहस्ते तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन ! उपमुख्यमंत्र्यांचे शेतकर्‍यांना आवाहन, म्हणाले – ‘शेतमालाचे उच्च दर्जाचे अधिक उत्पादन काढा’

 

Sooji Roti Recipe | डायबिटीज कमी ठेवण्यासह शरीरात एनर्जी राखते ‘सूजी’, अशी तयार करा सूजीची चपाती