Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’ची रुग्णसंख्या आटोक्यात, जाणून घ्या इतर आकडेवारी

0
67
Pimpri Corona Update | Corona cases under control in Pimpri Chinchwad, find out other statistics
File photo

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) लाट जवळपास ओसरली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Update) केवळ 05 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC Medical Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज (रविवार) दुपारी चार वाजेपर्यंत 865 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 05 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या 3 लाख 59 हजार 089 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 11 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 55 हजार 132 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 64 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 17 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 47 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी (दि.20) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 2847 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारामध्ये 34 लाख 75 हजार 811 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona Update | Corona cases under control in Pimpri Chinchwad, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 229 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Holi Precautions | होळी खेळताना ‘या’ 7 चुका करू नका नाहीतर…

 

Gauahar Khan On The Kashmir Files | अभिनेत्री गौहर खानने ‘द काश्मिर फाइल्स’वर केली ‘हे’ वक्तव्य, म्हणाली…

 

Anti Corruption Bureau (ACB) Aurangabad | बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचं घबाड! ACB चे अधिकारीही चक्रावले

 

Amol Mitkari | ‘छत्रपतींनी करून ठेवलेल्या ‘त्या’ गोष्टींमुळे पोर्तुगीजांना…”; इतिहासाचा दाखला देत मिटकरींचं भाजपवर टीकास्त्र

 

Credit Cards And Grocery Bills | ग्रोसरी बिल करायचे असेल कमी,
तर ‘या’ 6 क्रेडिट कार्डद्वारे मिळेल शानदार कॅशबॅक आणि डिस्काऊंट