Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा ! ‘कोरोना’च्या सक्रिय रुग्णांची संख्या शंभरच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 12 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 34 रुग्ण बरे झाले आहेत.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 1 हजार 730 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 59 हजार 071 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 34 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 55 हजार 108 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे. शहरामध्ये सध्या 70 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 13 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 57 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

शुक्रवारी (दि.18) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 2283 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 34 लाख 72 हजार 259 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Pimpri Corona Update | Great relief to Pimpri Chinchwadkar! The number of active patients of ‘Corona’ is less than one hundred, know other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

EPFO | प्रॉव्हिडेंट फंडात रू. 2.50 लाखोपक्षा जास्तीच्या योगदानावर आता लागणार टॅक्स, जाणून घ्या 10 महत्वाचे मुद्दे

 

CoronaVirus | चीन आणि काही यूरोपीय देशांत पुन्हा वेगाने वाढल्या कोरोना केस, केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र पाठवून दिले हे निर्देश

 

Kolhapur North By Election | अखेर कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय