Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 26 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या (Pimpri Corona Update) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. काल शहरात 8 रुग्ण आढळून आले होते. तर आज यामध्ये वाढ झाली आहे. त्याचवेळी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 33 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 26 रुग्ण बरे झाले आहेत.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 881 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 33 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 973 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 26 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 905 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे. शहरामध्ये सध्या 176 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 39 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 137 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी (दि.10) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 2435 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 34 लाख 52 हजार 955 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Pimpri Corona Update | In the last 24 hours, 26 patients in Pimpri Chinchwad were corona free, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Standing Committee | नगरसेवक पदाची मुदत संपली तरी स्थायी समिती विसर्जित होत नाही ! प्रसंगी न्यायालयात दाद मागणार – स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांचा दावा

 

Healthy Foods | इम्यून सिस्टम मजबूत करायची असेल तर डाएटमध्ये समाविष्ट करा ‘हे’ 6 हेल्दी फूड्स; जाणून घ्या

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा NCP व सेनेला टोला, म्हणाले – ‘राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्रित मतं नोटापेक्षाही कमी’