Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 51 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. आज शहरातील रुग्णांची संख्या पन्नासच्या आत आल्याने आणि एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 30 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 51 रुग्ण बरे झाले आहेत.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 264 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 30 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 710 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 51 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 363 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.
शहरामध्ये सध्या 458 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 44 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 414 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

सोमवारी (दि.28) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 65 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 34 लाख 19 हजार 658 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Pimpri Corona Update | In the last 24 hours, 51 patients in Pimpri-Chinchwad have been corona free, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Priyanka Chopra Oops Moment | लाईव्ह चॅट मध्येच प्रियंका झाली ‘Oops Moment’ ची शिकार, पती निक समोर झाली लाजिरवाणी..

 

Malaika Arora – Arjun Kapoor News | अर्जुन कपूरची बॉडी पाहून स्वत:ला रोखू शकली नाही मलाइका अरोरा, फोटोवर केली अशी कमेंट

 

Tina Dutta Bold Photo | पारदर्शक कपडे घालून पायऱ्यांवर उभी राहीली अभिनेत्री, फोटो पाहून सोशल मीडियाचा वाढला ‘पारा’