Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 89 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील रुग्णांची संख्या 50 च्या आत आली आहे. याचदरम्यान शहरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 48 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 89 रुग्ण बरे झाले आहेत.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 4 हजार 492 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 48 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 680 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 89 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 312 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 479 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 44 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 435 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

रविवारी (दि.27) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 5,035 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 34 लाख 19 हजार 593 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :-  Pimpri Corona Update | In the last 24 hours 89 patients in Pimpri Chinchwad were corona free find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा