Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवड शहराची ‘कोरोना’ मुक्तीकडे वाटचाल, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोनाची (Pimpri Corona Update) लाट ओसरत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Update) 26 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 76 रुग्ण बरे झाले आहेत. आज शहरात एकाही ओमायक्रॉनबाधित (Omacron) रुग्णाची नोंद झालेली नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC Medical Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दुपारी चार वाजेपर्यंत 5 हजार 048 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 26 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 777 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 76 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 54 हजार 530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 357 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 43 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 314 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,621 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी (दि.2) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 2 हजार 691 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 34 लाख 27 हजार 437 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Update | Pimpri Chinchwad’s journey towards Corona free city, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Ganesh Bidkar | गणेेश बिडकर यांचा यापुढील पुणे महापालिकेच्या कामकाजातील नोंद ‘सभागृह नेता’ नव्हे तर भाजपचे ‘गटनेता’ म्हणून होणार

 

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 15 हजाराची लाच घेताना ‘महावितरण’चा सहाय्यक अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात