COVID-19 : चिंताजनक ! पिंपरी चिचंवड शहरात 336 नवीन ‘कोरोना’ रुग्ण, 174 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्या वाढ होत आहे. रविवारी (दि.5) दिवसभरात सर्वाधिक 336 रुग्णांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 321 शहरातील आणि 15 जण हद्दीबाहेरील आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4288 इतकी झाली आहे. दिलासादयक म्हणजे आज दिवसभरात 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांची दुसरी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळून आलेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 179 पुरुष आणि 142 महिलांचा समावेश आहे. याशिवाय शहराबाहेरील 15 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून 13 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. यांच्यासह 101 रुग्णांवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये उपचार सुरु आहेत. शहरातील 11 जणांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे शहरातील 61 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शहराबाहेरील 32 जणांचा अतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या शहरामध्ये 1674 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. आज दिवसभरात 174 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 2543 जण कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील 222 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज शहरातील चिंचवड येथील केशवनगर येथील 68 वर्षीय पुरुष, पिंपरी बाबासाहेब आंबेडकर नगर येथील 49 वर्षीय महिला, प्राधिकरणातील क्षितीज नगर मधील 62 वर्षीय महिला आणि बोपखेल येथील 54 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.