Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2133 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने पिंपरी चिंचवडकरांना (Pimpri Chinchwad) दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) 2133 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 4369 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

शहरात आज 2133 नवीन रुग्णांचे निदान (Pimpri Corona Updates) झाल्याने शहरातील रुग्णांची संख्या 3 लाख 46 हजार 986 इतकी झाली आहे. यापैकी 3 लाख 23 हजार 680 रुग्णांनी कोरोनावर मात (Recover patient) केली आहे. आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 882 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली.

 

शहरामध्ये सध्या 19,474 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 500 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 18,974 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आज शहरातील 05 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,563 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 5930 जणांचे लसीकरण
रविवारी (दि.30) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 5930 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 32 लाख 70 हजार 225 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Updates | 2133 new patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा