Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 28 हजारांवर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3573 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना (Pimpri Corona) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असताना ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omycron Variant) चिंता वाढवली आहे. रुग्ण वाढत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 3573 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात महापालिका हद्दीमधील 03 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 3573 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 34 हजार 070 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 3150 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 01 हजार 670 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरामध्ये सध्या 28,586 अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहेत. यामध्ये होम क्वारंटाईनमध्ये 28,003 तर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 583 रुग्ण आहेत. आज दिवसभरात शहरातील एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,545 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 07 हजार 476 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 32 लाख 42 हजार 641 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- pimpri corona | updates as many as 3573 new corona patients in pimpri chinchwad in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 33,914 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune Crime | खोटा दस्त अस्तित्वात आणुन मोठी आर्थिक फसवणूक ! हनिफ सोमजी, सोहेल सोमजी, अलनेश सोमजी आणि जेनिस सोमजीवर गुन्हा दाखल

 

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक