Advt.

Pimpri Corona Updates | पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 4376 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pimpri Corona Updates | दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या रूग्णांचा आलेख वाढत आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात देखील कोरोनाच्या नव्या रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. रविवारी (दि. 23 जानेवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 4 हजार 376 नवे रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे 2 हजार 623 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Pimpri Corona Updates)

 

 

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 3 लाख 27 हजार 550 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 2 लाख 96 हजार 153 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळं पिंपरी-चिंचवड शहरात आजपर्यंत तब्बल 4 हजार 540 जणांचा मृत्यू झाला आहे. आता सद्यस्थितीला पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे तब्बल 27 हजार 588 रूग्ण हे अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी फक्त 586 जणांवर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत तर इतर 27 हजार 2 जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. (Pimpri Corona Updates)

 

नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे. गर्दी करू नये. सामाजिक अंतर बाळगावे अशा सूचना प्रशासनाकडून वेळावेळी देण्यात येत आहेत.
दरम्यान, विनामास्क (Without Mask) फिरणार्‍यांवर पिंपरी-चिंचवड महापालिका (Pimpri-Chinchwad Corporation)
आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून (Pimpri Chinchwad Police) दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Updates | As many as 4376 new corona patients in Pimpri-Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Period Pain | पीरियडच्या दरम्यान पोट आणि कंबरदुखीचा होत असेल त्रास तर ‘हे’ 5 घरगुती उपाय अवलंबा; जाणून घ्या

 

Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6299 नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune NCP | राष्ट्रवादीकडून पुण्यात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन; 204 युवक-युवतींना मिळाली रोजगाराची संधी