Pimpri Corona Updates | रुग्णसंख्येत मोठी वाढ ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2200 पेक्षा अधिक नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी (दि.12) शहरामध्ये 2065 रुग्ण आढळून आले होते. आज यामध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) 2277 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या तुलनेत आज 212 नवीन रुग्णांची भर पडली आहे. शहरात रुग्ण वाढत असताना ओमिक्रॉनचे (Omicron Covid variant) रुग्ण आढळून येत असल्याने आणि सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजाराच्या वर गेल्याने चिंता वाढली आहे.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 11 हजार 975 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 2277 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Updates) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 92 हजार 261 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 816 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 77 हजार 517 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 10,947 सक्रिय रुग्ण
शहरामध्ये सध्या 10 हजार 947 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यामध्ये 340 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 10 हजार 607 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहराबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,528 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

शहरात ओमिक्रॉनचा 2 रुग्ण
पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 02 ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्ण आढळून आला आहे.
यापैकी एक रुग्ण युएसए (USA) येथून आला आहे. तर एक जण दुबई (Dubai) येथून आला आहे.
या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

Web Title :- Pimpri Corona Updates | Big increase in patient numbers! More than 2200 new corona patients diagnosed in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC Aadharshila Plan | महिलांसाठी LIC ची विशेष विमा योजना, रोज 29 रुपये जमा केल्यावर किती लाख मिळतील, जाणून घ्या

 

Immunity Booster Tips | ‘या’ टिप्स महिलांसाठी ठरतील उपयुक्त, प्रतिकारशक्ती वाढेल आणि आजार देखील होतील दूर

 

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये 333 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 8.22 लाख रुपये मिळतील, जाणून घ्या कसे

 

Corporator Vasant More | नगरसेवक वसंत मोरे यांच्या एका Facebook पोस्टमुळं जखमी चेतनच्या मदतीसाठी एका रात्रीत जमा झाले 14 लाख (व्हिडिओ)