Pimpri Corona Updates | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 5181 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी दैनंदिन रुग्ण संख्या ही दोन हजारांच्या पुढेच आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) 2261 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 5181 रुग्ण बरे झाले आहेत. शहरात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ होत असताना ओमिक्रॉनचे (Omicron variant) रुग्ण आढळून येत आहेत.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 849 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 2261 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Updates) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 42 हजार 208 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 5181 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 14 हजार 437 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

शहरात 23,444 सक्रिय रुग्ण
शहरामध्ये सध्या 23,444 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत.
यामध्ये 504 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 23,444 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरातील 03 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,554 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Updates | Comfortable 5181 patients corona free in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा