Pimpri Corona Updates | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी घट, गेल्या 24 तासात 2942 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये रुग्णवाढीचा (Pimpri Corona Updates) आलेख मागील काही दिवसांपासून उतरताना पहायला मिळत आहे. आज शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाच्या 931 नवीन रुग्णांचे (Pimpri Corona Updates) निदान झाले आहे. तर 2942 रुग्णांनी कोरोनावर मात (Recover patient) केली आहे. रुग्ण संख्या कमी होत असताना शहरात ओमायक्रोनचे रुग्ण (Omycron Patient) आढळून येत आहेत. आज दिवसभरात 4 रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 11 हजार 092 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 931 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) रुग्णांची संख्या 3 लाख 47 हजार 917 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 2942 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 26 हजार 622 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

 

शहरामध्ये सध्या 17,459 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 495 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 16 हजार 964 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरातील 04 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद आज झाली आहे.
गेल्या 24 तासात 01 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,567 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Web Title :- Pimpri Corona Updates | Comfortable! Pimpri-Chinchwad has seen a sharp decline in the number of patients, with 2942 corona-free in the last 24 hours

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC Dhan Rekha Policy | चांगल्या रिटर्नसाठी ‘या’ पॉलिसीमध्ये करा गुंतवणूक, जाणून घ्या काय आहे विशेष

 

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2000 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

EPFO | पीएफ खातेधारकांसोबत होऊ शकते ऑनलाइन फसवणूक, EPFO ने सांगितली बचावाची पद्धत