Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चं थैमान ! आज शहरामध्ये तब्बल 2626 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना (Pimpri Corona Updates) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून दैनंदिन रुग्ण संख्या अडीच हजारांच्या पुढेच आहे. बाधितांचा आकडा काही कमी होताना दिसत नाही. त्यातच ओमायक्रोन व्हेरियंटने (Omicron Covid Variant) चिंता वाढवली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona Updates) 2626 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 2626 नवीन रुग्ण (Pimpri Corona Updates) आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 99 हजार 994 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1535 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 81 हजार 119 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरामध्ये सध्या 15 हजार 076 अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) आहेत. यामध्ये होम क्वारंटाईनमध्ये 14 हजार 509 तर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 567 रुग्ण आहेत. आज दिवसभरात शहरातील एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,530 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

ओमायक्रोनचे 3 नवीन रुग्ण
आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये ओमायक्रोनचे 3 नवीन पुरुष रुग्ण आढळून आले आहेत.
यापैकी एक रुग्ण बांगलादेश (Bangladesh), एक रुग्ण सौदी अरेबीया (Saudi Arabia) व एक रुग्ण सहवासातील तपासणीत आढळून आला आहे.
या रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Updates | Corona in Pimpri Chinchwad As many as 2626 new patients in the city today find out other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा