Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2386 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) रुग्णांच्या संख्येत घट होत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने दिलासा मिळाला आहे. आज शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) 2386 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 4092 रुग्ण बरे झाले आहेत.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 10 हजार 941 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 2386 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Updates) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 39 हजार 947 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 4092 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 09 हजार 256 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

शहरात 26,871 सक्रिय रुग्ण
शहरामध्ये सध्या 26,871 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 531 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 26,340 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरामध्ये 04 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे.
यामध्ये शहरातील 3 तर हद्दीबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे.
गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,551 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Updates | In Pimpri-Chinchwad, the number of patients recovering more than double the number of new patients, 2386 new patients of Corona in last 24 hours, know other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | सराईत वाहनचोराला खडक पोलिसांकडून अटक, 2 लाखांची वाहने जप्त

 

Disha Patani Bikini Photoshoot | दिशा पटानीचा बिकिनी लूकमधील जबरदस्त फोटो पाहून चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो

 

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 4 महिला डॉक्टरांचा ‘सामूहिक’ विनयभंग