Pimpri Corona Updates| चिंताजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1500 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल शहरामध्ये 1073 रुग्ण आढळून आले होते. आज यामध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) 1535 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरात रुग्ण वाढत असताना आज ओमिक्रॉनचे (Omicron variant) 15 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच सक्रिय रुग्णांची संख्या साडेपाच हजाराच्या वर गेल्याने चिंता वाढली आहे.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 9 हजार 637 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1535 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Updates) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 84 हजार 937 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 52 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 75 हजार 493 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात 5648 सक्रिय रुग्ण
शहरामध्ये सध्या 5648 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 408 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5240 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Pimpri Corona Updates)

शहरात ओमिक्रॉनचा 15 रुग्ण
पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 15 ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
15 रुग्णांमध्ये 6 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. 15 पैकी 4 रुग्ण कॅनडा (Canada), 1 रुग्ण मालदीव (Maldives),
1 दुबई (Dubai), 1 माली (Mali) आणि तीन 3 रुग्ण युएसए (USA) येथून आले आहेत.
तर 5 रुग्ण परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्याने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या रुग्णांवर उपचार सुरु आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Updates | Worrying! More than 1500 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड वाढल्याने ‘या’ आजारांचा वाढू शकतो धोका; जाणून घ्या कसे करावे नियंत्रण

 

Pune Crime | कर्नाटकातून पुण्यात विक्रीसाठी आणलेला 46 लाखांचा गुटखा हडपसर पोलिसांकडून जप्त

 

Anti Corruption Bureau Pune | पुणे अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या कोल्हापूरमध्ये 11 लाखाच्या लाच प्रकरणी प्रांताधिकारी ‘प्रधान’ आणि सरपंच ‘डवर’ला ACB कडून अटक

 

Pune Cyber Crime | बजाज फायनान्स कंपनीचे संजीव बजाज यांच्यासह तिघांना ईमेलद्वारे 11.5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी