Pimpri Corona | चिंतेत भर ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 1000 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. शहरात रुग्ण वाढत असताना बरे होण्याचे (Recover patient) प्रमाण कमी झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच शहरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 1000 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.

 

वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 7868 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1000 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Pimpri Corona) संख्या 2 लाख 82 हजार 329 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 27 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 75 हजार 398 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 3 हजार 135 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 326 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2809 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 22 हजार 143 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 30 लाख 40 हजार 822 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | Worry! 1000 new patients of Corona in Pimpri Chinchwad, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona | चिंताजनक! पुण्यातील ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात तब्बल 2757 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

TET Exam Scam Case | अटकेत असलेल्या तुकाराम सुपेसह 5 आरोपींना कोरोना; पोलीस उपायुक्तांसह 11 अधिकार्‍यांना देखील कोरोनाचा संसर्ग

 

Gold Price Today | आज पुन्हा घसरले सोने; चांदीही उतरली, कुणीही विचार केला नसेल इतक्या घसरणीचा, जाणून घ्या आजचा दर

 

Pune Crime | पोलीस अधिकाऱ्याच्या जागेत बिल्डरचे बेकायदा अतिक्रमण ! सुमेरु बिल्डकॉन प्रा. लि. च्या विजय रायकर यांच्यासह तिघांविरुद्ध FIR

 

Leucorrhoea-White Discharge | आयुर्वेदिक उपायांनी लवकर सोडवा ‘ल्यूकोरिया’ म्हणजे व्हाईट डिस्चार्जची समस्या; ‘त्रिफळा योनी वॉश’ची कृती जाणून घ्या