Pimpri Corona | चिंताजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 817 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी (दि.5) शहरामध्ये 590 रुग्ण आढळून आले होते. आज यामध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 817 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरात रुग्ण वाढत असताना ओमिक्रॉनचे (Omicron variant) रुग्ण आढळून येत असल्याने आणि सक्रिय रुग्णांची संख्या दोन हजाराच्या वर गेल्याने चिंता वाढली आहे.

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 7 हजार 912 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 817 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 81 हजार 329 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 22 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 2 लाख 75 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 2162 सक्रिय रुग्ण

शहरामध्ये सध्या 2162 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 282 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1880 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच शहरातील पूर्वी मृत्यू झालेल्या एका रुग्णाचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

शहरात ओमिक्रॉनचा 1 रुग्ण

पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज एक ओमिक्रॉन (Omicron) बाधित रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण युएसए (USA) येथून आला आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title : Pimpri Corona | Worrying! 817 Corona patients diagnosed in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी