‘हॉटस्पॉट’ भागातील ‘कोरोना’चे रुग्ण प्राधिकरणात हलविण्यास स्थानिक नगरसेवकांचा विरोध

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असून ‘हॉटस्पॉट’ असेलेल्या आनंदनगर भागातील नागरिकांचे स्थलांतर प्राधिकरणातील पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र
आत्तापर्यंत एकही बाधित रूग्ण नसलेल्या ‘ग्रीनझोन’ प्राधिकरणात या रुग्णांचे स्थलांतर करु नये यासाठी राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवित नगरसेवकांनी कॉलेजच्या प्रवेशव्दारावर तळ ठोकला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील आनंदनगरचा परिसर कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. गेल्या काही दिवसांत ३० हून अधिक जास्त ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण या भागात सापडले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथील नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात केली आहे. या भागातील नागरिकांना प्राधिकरण येथील पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये हलवण्यात येत आहे. मात्र याला स्थानिक नगरसेवक राजू मिसाळ व व अमित गावडे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. बाहेरिल एकाही नागरिकाला आम्ही येथे स्थलांतरित होऊ देणार नाही अशी भूमिका या दोन्ही नगरसेवकांनी घेतली आहे.

याबाबत बोलताना नगरसेवक राजू मिसाळ व अमित गावडे म्हणाले की, कोरोनाच्या या संकटात आम्ही प्रशासनासोबत आहोत. सुरूवातीपासून आकुर्डी-प्राधिकरण प्रभागात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अनेक उपाययोजना आम्ही करत आहोत. प्राधिकरणाच्या परिसरात आजपर्यंत एकही बाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे हा परिसर ‘ग्रीनझोन’ ठरला आहे. मात्र या परिसरात ‘हॉटस्पॉट’ मधील नागरिकांचे स्थलांतर झाल्यास इथला परिसर देखील धोक्यात येऊ शकतो. सत्ताधारी भाजपाच्या दबावामुळे प्रशासन या महामारीत देखील असे राजकारण करत आहे. याला आमचा तीव्र विरोध आहे. आम्ही येथे एकाही बाहेरील नागरिकांचे स्थलांतर होऊ देणार नसल्याची भूमिका राजू मिसाळ व अमित गावडे यांनी घेतली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like