‘IT पार्क’सह पिंपरी चिंचवड शहरावर ‘कोरोना’चे सावट

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात ‘कोरोना व्हायरस’ने शिरकाव केला आहे. दुबईहुन आलेल्या दाम्पत्याला याची लागण झाली. यानंतर एक एक संख्या वाढत आहे. यातच देशातील सर्वात मोठे असणाऱ्या आयटी पार्क मध्ये याचे सावट आले आहे. काही कंपन्यामधील आयटीएन्स ची तपासणी सुरु आहे, तर काही कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ च्या सूचना दिल्या आहेत. याच बरोबर शहरातील उपनगरातील काहीची तपासणी सुरु असल्याने संपूर्ण शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मोठ्या शाळा, कॉलेज ला सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत.

राज्यात पहिला कोरोना ग्रस्त रुग्ण पुणे शहरात आढळला. यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये एक वेगळा प्रकार समोर आला आहे. सहलीसाठी मलेशियाला गेलेल्या येथील एका कुटुंबालाच सोसायटीत प्रवेश करू न देण्याचा सोसायटीधारकांनी निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या धास्तीनेच सोसायटीधारकांनी असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. हे प्रकरण पोलिसांकडे गेले असून स्वतःच्या मालकीच्या घरात त्यांना येण्यास कोणालाही रोखता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

शहरातील हिंजवडी आयटी पार्कवर मोठे सावट आहे. दोन दिवसांपूर्वी येथील एका कंपनीत संशयित आढळला असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरातील मोठ्या शाळांना सुट्या देण्यात आलेल्या आहेत. तर ‘आयटीएन्स’ना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याच बरोबर शहरात आणि उपनगरातही भितीचे सावट आहे. परिसरात काही जणांची तपासणी केली असल्याने मोठे सावट आहे.

मात्र तपासणी केली जात असून भितीचे काही कारण नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय योजना सुरु असून नागरिकांनी स्वतः काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.