Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्येत घट, दिवसभरात 193 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले आहे. शहरात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण घटले असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने ही दिलासादायक बाब मानली जात आहे. तसेच शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटली असून आरोग्य यंत्रणेवरील ताण काहींसा कमी झाला आहे. आज दिवसभरात शहरामध्ये 200 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत तर 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 86 हजार 296 वर पोहचली आहे. आज 193 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 82 हजार 510 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.

गेल्या 24 तासामध्ये शहरात कोरोनामुळे 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 6 रुग्ण हे पालिका हद्दीबाहेरील आहेत तर 2 रुग्ण हे शहरातील आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये निगडी, कासारवाडी, चिंचवड, काळेवाडी, दिघी, बोपखेल, आंबेगाव, आळंदी येथील रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 2117 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1499 शहरातील तर 618 पालिका हद्दी बाहेरील आहेत. सध्या शहरामध्ये 1336 सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर पालिका रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील परंतु पुण्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 317 इतकी आहे.

You might also like