Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात अ’ आणि ‘ह’ क्षेत्रीय प्रभाग ‘हॉट स्पॉट’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 198 आणि ‘ह’ कार्यालयाच्या हद्दीत 161 सक्रिय रुग्ण आहेत. तर, सर्वात कमी म्हणजेच 23 रुग्ण ‘ब’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत आहेत.
महापालिकेने रात्री दिलेल्या नकाशानुसारची ही आकडेवारी आहे. आतापर्यंत 43 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, शहरातील आजपर्यंत रुग्ण संख्या 1826 झाली आहे.

10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 1826 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1059 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 734 सक्रिय रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, 33 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. झोपडपट्टी, गावठाण भागात रुग्ण वाढ होताना दिसून येत आहे. जूनअखेरपर्यंत अडीच ते तीन हजार रुग्ण होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.
महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालयनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो.

रविवारी रात्री प्रसिध्द केलेल्या नकाशानुसार संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण परिसर येत असलेल्या ‘अ’ प्रभागाच्या हद्दीत सर्वाधिक तर त्याखालोखाल ‘ह’ कार्यालयाच्या हद्दीत रुग्ण आहेत.