Pimpri Crime | 1.5 कोटींची फसवणूक ! ‘पुणे पिपल्स’चा सेवानिवृत्त बँक मॅनेजर महेश केकंरे, विनोदकुमार जैन-पाटणी, प्रकाश गुजर, स्वप्नील राक्षेवर FIR दाखल

पिपंरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online ) Pimpri Crime | भागीदारीत व्यवसाय सुरु केला असताना बँक मॅनेजरला (Bank Manager) हाताशी धरुन दीड कोटी रुपयांची फसवणूक (Cheating) करुन दोन फर्म ताब्यात घेण्याचा प्रकार समोर (Pimpri Crime) आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (hinjewadi police) पुणे पिपल्स को़ ऑप बँकेचे (pune peoples cooperative bank) सेवानिवृत्त मॅनेजरसह 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. विनोदकुमार पारसमल जैन – पाटणी (रा. बावधन), प्रकाश गुजर, राजेश, महेश प्रभाकर केकंरे (सेवानिवृत्त मॅनेजर, पुणे पिपल्स को ऑप बँक, कोथरुड शाखा) आणि बँकेचा तत्कालीन सेवक स्वप्नील राक्षे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सिताराम हाथीराम चौधरी (वय ३६, रा. पुनावळे, पिंपरी चिंचवड) यांनी हिंजवडी पोलिसांकडे (hinjewadi police) फिर्याद दिली आहे.

आरोपी विनोदकुमार जैन यांनी फिर्यादी चौधरी यांच्यासोबत अंर्तमना पी. व्ही. ग्रेनाईट (Antarmana Pv Granites) व अंर्तमना टाईल्स (antarmana tiles) या फर्मचे नावे 33 गुंठे जागा भाड्याने घेण्यासाठी व तेथे भागीदारीत ग्रेनाईट विक्रीचा व्यवसाय सुरु करण्यास प्रवृत्त केले.

त्यासाठी 32 लाख रुपये गुंतवणुक करायला प्रवृत्त केले. फिर्यादी यांच्या स्वत: च्या अंर्तमना टाईल्स (antarmana tiles) या फर्मच्या पुणे पिपल्स बँकेच्या कोथरुड शाखेचे तत्कालीन बँक मॅनेजर महेश केकंरे व सेवक स्वप्नील राक्षे, यांच्याशी संगनमत करुन अंर्तमना टाईल्स या फर्मच्या केवायसी/संगणकप्रणालीमधील कागदपत्रात व माहितीमधील कागदपत्रात फेरफार करुन बँकेच्या खात्यामध्ये असलेल्या फिर्यादीचा मोबाईल क्रमांक बदलून त्या जागी विनोदकुमार जैन यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली.

प्रकाश गुजर व राजेश यांना हाताशी धरुन बँकेतील या फर्मच्या खात्यातून 82 लाख 28 हजार 82
रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला.
अंर्तमना टाईल्स या फर्म असलेल्या मालाचा स्टॉक 34 लाख 8 हजार 640 रुपये यावर हा
फिर्यादीच्या ताब्यात असताना विनोदकुमार जैन याने त्यांना प्रवेशास अटकाव केला.
फर्मवर बेकायदेशीरपणे कब्जा करुन विश्वासघात करुन फिर्यादीचे 1 कोटी 48 लाख 36 हजार 722 रुपयांचा आर्थिक नुकसान केले.

व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या ड्राव्हरमध्ये फिर्यादी यांच्या नावे असलेले बँकेचे 50
चेकपैकी अंदाजे 20 चेकवर फिर्यादी यांनी स्वत:च्या सह्या केलेले चेक होते.
त्याचा व सह्या न केलेले अंदाजे 12 चेकवर फिर्यादी यांच्या बनावट सह्या करुन जैन याने फिर्यादीच्या खात्यातून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी या चेकचा गैरवापर करुन आर्थिक फसवणूक केली आहे.
अंर्तमना पी व्ही ग्रेनाईट (Antarmana Pv Granites) व अंर्तमना टाईल्स (antarmana tiles)
या दोन्ही फर्म जैन याने स्वत:च्या ताब्यात घेऊन फिर्यादी हे तेथे गेले असताना त्यांना धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

Web Title : Pimpri Crime | 1.5 crore fraud ! FIR against Retired Bank Manager of ‘Pune People’s’
Mahesh Kekanre, Vinod Kumar Jain-Patni, Prakash Gujar, Swapnil Rakshe

हे देखील वाचा

Mumbai : DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’

Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !

El-Colacho Festival | ‘इथं’ भररस्त्यात मुलांना झोपवून वरून उडी मारतो व्यक्ती,
धर्माच्या नावावर भयंकर परंपरा सुरू