Pimpri Crime | वाहनचोर जोमात, पिंपरी-चिंचवड शहरातून 6 दुचाकी चोरीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये (Pimpri Crime) वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. वाहन चोरीचे (vehicle thieves) गुन्हे रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून (Pimpri-Chinchwad Police) नाकबंदी, गस्त घातली जात आहे. मात्र, वाहन चोरटे पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाहन चोरी करत आहेत. बुधवारी (दि.4) पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सहा दुचाकी चोरीचे (Crime) प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात (police station) गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. शहरात होणाऱ्या दुचाकी चोरीमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

उत्तम लहू खांडेकर (वय-34 रा. ताम्हाने वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali police station) फिर्याद दिली आहे. खांडेकर यांनी त्यांची दुचाकी राहत्या घराच्या पार्किंगमध्ये लॉक करुन पार्क केली 12 हजार रुपयाची दुचाकी (एमएच 09 ईपी 4008) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार बुधवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास उघडकीस आला.

Pimpr Crime | 6 bikes stolen from Pimpri-Chinchwad

राजकुमार अग्नू जगताप (वय-25 रा. मोरे वस्ती, चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. जगताप यांनी त्यांची काळ्या रंगाची होंन्डा शाईन (एमएच 13 बीएल 8580) 16 जुलैला पिंपरीतील यशवंत नगर येथे टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीच्या हंगामी कामगारांच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली.

राजेश गणपत पाटील (वय-40 रा. अश्रिया बिल्डिंग, पाटीलनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यांची त्यांची होंडा कंपनीची 50 हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टीव्हा मोपेड (एमएच 14 एचटी 2556) देहू-आळंदी रोडवर चौधरी ढाब्यासमोर पाटील नगर येथे लॉक करुन पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली.

क्षितिज हिमांशु राच (वय-28 रा. द अ‍ॅड्रेस सोसायटी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) फिर्याद दिली आहे. राच यांनी 30 हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टिव्हा मोपेड (एमएच 14 ईआर 3805) राहत्या घराच्या पार्किंमध्ये लॉक करुन पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार बुधवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आला.

अब्दुल्ला फारुख सय्यद (वय-33 रा. संजय राऊत बंगल्या जवळ, देहूरोड) यांनी देहुरोड पोलीस
ठाण्यात (Dehurod Police Station) फिर्याद दिली आहे. सय्यद यांनी त्यांची 15 हजार रुपये
किमतीची स्प्लेंडर (एमच 14 बीपी 2488) दुचाकी सुबान्नला हॉटेल समोर पार्क केली होती. अज्ञात
चोरट्यांनी बनावट चावीने लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आला.

प्रतिक प्रकाश गावंडे (वय-26 रा.लक्ष्मी चौक, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात
(Hinjewadi police station) फिर्याद दिली आहे. गावंडे यांनी त्यांची दुचाकी (एमएच 07 एम
3703) राहत्या घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. हा
प्रकार बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला.

हे देखील वाचा

IED Blast | छत्तीसगडमधील दंतेवाड्यात नक्षलवाद्यांचा सुरुंग स्फोटात १२ ग्रामस्थ जखमी

Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपाल आणि ठाकरे सरकार नवा संघर्ष चिघळणार? राज्यपालांच्या दौऱ्यावेळी पालकमंत्री अनुपस्थित राहणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pimpri Crime | 6 bikes stolen from Pimpri-Chinchwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update