Pimpri Crime | पुण्यातील उद्योजक नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाडसह टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Crime | पुण्यातील उद्योजक नानासाहेब गायकवाड (Nanasaheb Gaikwad), गणेश गायकवाड सह 5 जणांवर मोक्का (MCOCA Action) Mokka कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सराईत गुन्हेगारामध्ये त्यांचा समावेश करुन त्यांच्यावर मोक्का (Pimpri Crime) कारवाई केली आहे.

सांगवी पोलीस स्टेशनचे (Sangvi police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे (Senior Police Inspector Ranganath Unde) यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ -2 आनंद भोईटे (Deputy Commissioner of Police Anand Bhoite) यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (Additional Commissioner of Police Ramnath Pokale) यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला आज (मंगळवार) मंजुरी देण्यात आली.

गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड, नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आय.टी.आय रोड, औंध), गणेश ज्ञानेश्वर साठे (वय-3 रा. हनुमान मंदिरासमोर, पिंपळे निलख), राजु दादा अंकुश (रा. श्रावणी बिल्डींग, फ्लॅट नं. गल्ली नं. 1 पिंपळे गुरव), दिपक गवारे (रा. जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे) यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

गणेश गायकवाडवर अनैसर्गिक संभोग करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पत्नीने दाखल केला होता. यामध्ये सासरे नानासाहेब गायकवाडसह अन्य आरोपींचा समावेश होता. त्यासह एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये दंगा करुन खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करुन मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, दरोडा घालणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी, सांगवी, पुणे शहरातील चतु:श्रृंगी, चंदननगर आणि पुणे ग्रामीण पौड पौलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल आहेत.
गणेश गायकवाड आणि त्याचे वडील नानासाहेब गायकवाड यांना इतर आरोपींनी साथ दिली.
ही टोळी वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी संघटित गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash),
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ (Deputy Commissioner of Police Sudhir Hiremath),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 आनंद भोईटे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 डॉ. प्रशांत अमृतकर (Assistant Commissioner of Police Dr. Prashant Amritkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पीसीबी गुन्हे शाखा राजेंद्रसिंह गौर,
सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, पीसीबी गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई शिमोन चांदेकर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pimpri Crime | Action against the gang including Pune businessman Nanasaheb Gaikwad and Ganesh Gaikwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus | महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांसह देशातील 18 जिल्हे वाढवताहेत चिंता, आरोग्य मंत्रालयाचा दावा

Maharashtra Government | राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले महत्वाचे 4 निर्णय

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 183 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी